Skip to main content

खरंच, कीव येते मला मोदी भक्तांची!

        सध्या लोकशाहीचा चौथा स्तंभ कोसळला आहे. रवीश कुमार यांच्यासारखे

काही योद्धे खंबीर लढा देत आहेत. बहुतांश मीडिया सरकारची स्तुती करण्यात मग्न आहे.

बिहार, आसाम मधील पूरस्थिती पेक्षा राम मंदिराचा प्रश्न आजकाल मेनस्ट्रीम मीडियाला

महत्त्वाचा वाटतोय का, तर हो? उत्तर प्रदेश सारख्या राज्यांमध्ये जिथे अत्यंत बिकट

अवस्थेमध्ये आरोग्यव्यवस्था आहे, तिथेदेखील सरकारची मंदिरा विषयीची भूमिका बघून

खरंच त्याला समर्थन करणाऱ्यांची मला कीव येते! अशा परिस्थितीमध्ये जेव्हा दवाखाने

उभारण्याची गरज आहे, तेव्हा प्राइम टाईम मध्ये "कब बनेगा राम मंदिर" असे विषय

महत्त्वाचे वाटत असतील ना तर खरंच ही प्राईम टाईम बघनाऱ्याची मला कीव येते.

त्यातही त्यांची चूक नाही म्हणा ते आतापर्यंत हेच बघत आहेत. पण खरच वाटत नाही का तुम्हाला,

जेव्हा हनुमान चालीसा म्हटल्याने कोरोना बरा होईल अशी म्हणणारी साध्वी प्रज्ञा

स्वतः AIIMS मध्ये जाते आणि दुसऱ्यांना म्हणते की हनुमान चालीसा म्हटल्याने कोरोना बरा होईल,

हा इतका स्पष्ट विरोधाभास देखील दिसत नसेल का काही लोकांना?

ते असो परिस्थितीची जाण असणारे काही जण बोलत आहेत, त्यांना ट्रॉलर्स आर्मी उत्तरे देत आहे,

एवढ्या वाईट परिस्थितीतही भरपूर जण आपल्या मतावर ठाम आहेत आणि त्यांची संख्या

वाढत आहे हीच ती एक चांगली बाब!

आत्ता एक खूप महत्त्वाचा मुद्दा "भांडवलशाही"!

तर अशा या परिस्थितीमध्ये भारतीय मिडियाने दाखवलेली स्टेटमेंट आणि रिपोर्ट

याच्या आधारावर जेव्हा कोणी माझ्यासोबत आर्ग्युमेंट करतो की भारतीय अर्थव्यवस्था

सुधारत आहे, तेव्हा खरंच मला त्याची कीव येते! खरं तर ते थोडे विचित्रच युग आहे.

इथे स्वयंघोषित जाणकारांची संख्या जास्तच आहे. खरंच तो व्यक्ती त्या क्षेत्रातला

तज्ञ आहे का, त्याने यापूर्वी या क्षेत्रांमध्ये काही उल्लेखनीय कार्य केले आहे का,

याचा काडीमात्रही विचार न करता जेव्हा अशा लोकांना फॉलो करून तेच खरे आहेत

असं म्हटलं जातं ना तेव्हा खरच असं म्हणण्याची मला कीव येते! उदाहरण द्यायचे

असल्यास भारतीय अर्थव्यवस्था उत्तम उदाहरण होऊ शकते. जेव्हा रघुराम राजन,

अभिजित बॅनर्जी यांसारखे उच्च विभूषित नोबेल पुरस्कार प्राप्त अर्थतज्ञ मानतात की

अर्थव्यवस्था कोसळत आहे, तेव्हा त्यांना खोटे ठरवून, (अविश्वासाहार्य) आकडेवारी दाखवून

तसे काय नाही असे सरकार म्हणते, आणि त्याच्यावर अंधभक्त प्रमाणे एखादा व्यक्ती

विश्वास ठेवतो ना, तेव्हा मला त्या व्यक्तीची कीव वाटते!

भारताच्या इतिहासात आज पर्यंत एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही असा

एकमेव प्रधानमंत्री असेल तर तो आहे "नरेंद्र मोदी"! जेव्हा सभागृहात विचारलेल्या

गेलेल्या प्रश्नांची उत्तरे ट्विटरवर देऊन मोकळे होऊन; माझेच खरे असे म्हटल्यावर देखील

जो त्याच्यावर विश्वास ठेवतो ना त्या व्यक्तीकडे बघून मला थोडी फार कीव वाटते!


स्वतःच्या वर्तमानातील प्रश्नांना उत्तरे न देता भविष्यात आम्ही हे करू, अखंड हिंदू राष्ट्रासाठी

आम्ही हे करत आहोत, आणि तुमचे तुम्ही पहा असच काही धोरण केंद्र सरकारचा आहे

असे मला वाटते. 24 मार्च 2020 रोजी 21 दिवसात कोरोना जाईल असे विधान केले गेले.

त्यानंतर टाळ्यांचा नाद झाला, मेणबत्त्या लावून देखील झाल्या,तरीदेखील चार महिन्यांनी

भारतात केसेस वाढत असेल आणि कदाचित या दहा बारा लाखांच्या पुढे पोचल्या आहेत.

स्वतःवर ची जबाबदारी राज्य शासनावर ढकलून मोकळे झालेले हे केंद्र सरकार आता

म्हणत आहे ही जनतेची लढाई आहे. मग काय दवाखाने औषधे यांची व्यवस्था जनतेने करायची?

मग जनतेने दिलेला PM Cares चा निधी कुठे गेला ,किती आला आणि कसा वापरला गेला

याची उत्तरे का देत नाही आम्हाला? जरी नाव प्राईम मिनिस्टर फंड असले, तरी ते

सरकारच्या अधिपत्याखाली येत नाही ह्याला कुठले लॉजिक?

चीनने भारतात घुसखोरी केलीच नाही असे बेजबाबदार स्टेटमेंट दिशाभूल करणारे आहे असे वाटत नाही तुम्हाला?

बर या दरम्यान काय काय होते माहिती आहे का?

दिशाभूल करणारी माहिती , खोटा राष्ट्रवाद मुद्दामहून पुढे करणे, स्वायत्त संस्थांना मोडकळीस आणणे,

इलेक्शन कमीशन सारख्या जबाबदार संस्थेची डिजिटल मार्केटिंग करण्यासाठी डेटा बीजेपीच्या

कार्यकर्त्याच्या (BJP IT Cell) दिला जाणे, त्या माहितीचा दुरुपयोग होणे, हे आणि याहून अधिक

विचार करायला भाग पाडणाऱ्या घटना घडत आहेत.

Reference: https://mobile.twitter.com/SaketGokhale/status/1287651915837222916


अजून एक प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट, कोणतीही मोठी घसरण झाली, चूक झाली किंवा

आंतरराष्ट्रीय पातळीवर टीका झाली; तर या सर्व गोष्टीला भूतकाळ थोडक्यात पंडित नेहरू

जबाबदार असे यांचे एक वाक्य! मग ते अर्थव्यवस्था असेल किंवा

द्वीराष्ट्रीय संबंध वगैरे वगैरे! इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला जातोय, चुकीच्या पद्धतीने

चुकीची वाक्य फेक न्युजच्या माध्यमातून पसरले जातात. पाठ्यपुस्तकातून तो भागच

कमी केला जातो, जेणेकरून शाळेत नवीन येणारा मुलगा त्याविषयी कधी ऐकणारच नाही.

खरंच ही खूप मोठी लढाई आहे यात शंकाच नाही!


एक सांगू, काही काळानंतर जेव्हा तुम्ही विचाराल की माझ्या नोकरीचे काय?

तेव्हा हे सरकार असे उत्तर देण्यात जराही कचरणार नाही की तुझी चुकी आहे,

हे बदलते युग आहे, त्यामध्ये तू बदलला नाहीस, आम्ही याला काय करू?

तेव्हा मात्र तुम्ही काहीही करू शकणार नाही आणि तुम्हाला नक्की जाणीव होईल

हा नक्कीच चुकीचा मार्ग होता आणि मी यावर जायला नको पाहिजे होते.

म्हणजे थोडक्यात असे वाटते की, स्वतःच्या जबाबदाऱ्या वर्तमान काळात पूर्ण न करता,

कदाचित भविष्यात ती जनतेची चुकी होती, तुम्ही तसे केले नाही; हे प्रत्येक बाबतीत होईल,

जसे आज आपण कोरोनाच्या बाबतीत घडत आहे.

भारत तीन नंबर वन आहे, भारी वाटते ना ऐकून? अहो पण कशात हे तरी विचाराल? सगळ्यात जास्त कारोना केसेसमध्ये!

हे नाही दाखवणार हो, मेनस्ट्रीम मीडिया! आणखी एक गोष्ट भारताचा प्रेस फ्रीडम इंडेक्स मध्ये 142 वा क्रमांक लागतो. जर आज मीडियाचा स्वतंत्र नसेल आणि सरकारचे बाहुले असेल, तर त्यावर आपण नक्कीच किती विश्वास ठेवणार आहोत हे तर विचार करायला हवेच!

जरा जास्त झाले होय?

एवढे वाचून देखील, तुम्ही अजून विचार करत असाल की "Narendra Modi is the best PM." तर आता शंभर टक्के सांग खरंच मला तुमच्याविषयी कीव वाटतं! फक्त पुतळे आणि मंदिर बांधून काही होत नसतं एवढं मात्र नक्की!

एवढ्या सगळ्यापेक्षा मोठं climate change च संकट आहे, त्याकडे पण बघा जरा, नाहीतर जगणं अवघड होईल!

Reference: https://youtu.be/HLn55K5E56w

वर मांडलेली मते लेखकाची वैयक्तिक मते आहेत. त्याचा कोणत्याही संघटनेशी काहीही संबंध नाही. विवेकी राहून वाचाल ही अपेक्षा. तरीदेखील कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करावी असे वाटत असेल, तर बिनधास्त मेसेज करा.

संकेत तांबारे,

Comments

  1. सत्यता सुरेखपणे वर्तवली आहे

    ReplyDelete
  2. Hii dare writer नक्कीच अनभिज्ञ राहल्यास ती कीव येईल

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Those 2 incredible days in Tarkarli...!!!

प्रवास वर्णन... Travelogue वगैरे वगैरे... खरंतर हे प्रवासवर्णन आग्रहाने मराठी लिहावे असे ठरवले. सुट्टीहून इथे आल्यावर फिरायला जायचे आहे हे तर नक्की होतो. पण कधी हे मात्र नक्की नव्हतं. अचानक कॉल आला. संदेश होता "पाच मिनिटात Cse stairs वर ये ट्रिपचे नियोजन करायचे आहे". उत्तेजित झालेला मी लगबगीने stairs वर पोहोचलो. स्वागत तर उत्साहाने झालेच. नंतर कळाले की परवा 29 तारखेला निघायचे आहे. मग काय गाडीचे नियोजन, हॉटेलचे नियोजन सर्वकाही डोळ्यासमोर येऊ लागले. यक्षप्रश्न होता कोण आणि किती जण येणार? अथक प्रयत्नानंतर सहा जण तयार झाले. मग काय, फोन करणे सुरु होतेच. काहीजण घरी विचारत होते तर काहीजण गावी होते. संध्याकाळपर्यंत सर्वांना विचारून झाल्यावर लक्षात आले की सर्वजण directly किंवा indirectly नाहीच म्हणत आहेत. गेल्या वेळेसारखेच परिस्थिती होती. गाडी बुक केली होती १७ सीटर, यायला तयार होते नऊ जण. मग काय आदल्या रात्री ती कॅन्सल करून तवेरा बुक करावी लागली. प्रारब्ध म्हणा किंवा नशीब म्हणा, काहीही म्हणा... या सहलीत आम्हाला काका भेटले. एक अवलिया व्यक्तिमत्व. बारावीनंतर मुंबईला घेऊन पैसे कमव...

वासोटा: घनदाट जंगलांनी वेढलेला एक अभेद्य गड...

डोंगर, बोट, पक्षी अणि दुरवर पसरलेले डोंगर📸 "वासोटा ट्रेक"कदाचित इतकीच माहिती होती ट्रेकला निघण्यापूर्वी, प्रत्यक्षात तो थरार अनुभवण्याचा भावनेनेच विचारता क्षणीच जाण्यास तयार झालो आणि हे सर्व झाले एका दिवसात. पूर्वी अनेकदा कोकणात गेलो होतो पण यावेळी घनदाट जंगलातला प्रवासाची मनात उत्सुकता होतीच. शेवटी तो दिवस आला. सकाळी चार वाजता आम्ही निघालो. प्रवास सुरू झाला. पहाटेचे थंड वारे, गाडीत वाजणारी गाणी, गप्पा गोष्टी, जवळपास सकाळी सहा वाजता कास पठारावर पोहोचलो. दाट धुक्यांनी झाकलेल्या डोंगररांगा धुक्यांनी आच्छादलेला जलाशय समोरचे दृष्य अनाकलनीय होते. दाट धुक्याच्या चादरीने सर्व डोंगर झाकलेले होते. घाटात उंचावर असताना देखील खाली काही दिसत नव्हते. समोर दूरपर्यंत धुके, मधूनच वर आलेले डोंगराची सुळके, आणि धोक्यांनी झाकलेले कोयना बॅक वॉटरचे पाणी. सह्याद्रीचे हे अविस्मरणीय रूप पहिल्यांदाच पाहत होतो. सकाळी लवकरच बामनोली गावात पोहोचलो. इथूनच वाचवण्यासाठी बोट मिळणार होती.जलाशयाकडे गेलो तर दुस-याने आच्छादलेल्या पाण्यामध्ये अगदी दहा मीटर च्या पुढे काहीही दिसत नव्हते...

Book Review: मी अल्बर्ट एलिस PART:1

Book Name: मी अल्बर्ट एलिस Writer: albert ellis Translated in Marathi by Dr. Anjali Joshi The book connects the youth as it tackles with the daily questions that youth generally faces. The great book, as per me. Some thoughts include: 1. Your parents are not responsible for development in the childhood. It's upon the baby how he develops himself. 2. There are some situations in life which make you angry. If we basically thought about this, this anger is caused by actions caused your thoughts ultimately resulting into your suffering So what if we could, control our thoughts in such situation, thus controlling our actions and reducing the consequences thereafter. 3. In the situations where you cannot control the situation due to pressure by external entities, think what thing you can do for the betterment of situation or for better utilisation of time. 4. Fears: Created by our thoughts, our thinking and ultimately frightening us only. So what we can do, change the way you t...