Skip to main content

वासोटा: घनदाट जंगलांनी वेढलेला एक अभेद्य गड...

डोंगर, बोट, पक्षी अणि दुरवर पसरलेले डोंगर📸


"वासोटा ट्रेक"कदाचित इतकीच माहिती होती ट्रेकला निघण्यापूर्वी, प्रत्यक्षात तो थरार अनुभवण्याचा भावनेनेच विचारता क्षणीच जाण्यास तयार झालो आणि हे सर्व झाले एका दिवसात. पूर्वी अनेकदा कोकणात गेलो होतो पण यावेळी घनदाट जंगलातला प्रवासाची मनात उत्सुकता होतीच.
शेवटी तो दिवस आला. सकाळी चार वाजता आम्ही निघालो. प्रवास सुरू झाला. पहाटेचे थंड वारे, गाडीत वाजणारी गाणी, गप्पा गोष्टी, जवळपास सकाळी सहा वाजता कास पठारावर पोहोचलो.
दाट धुक्यांनी झाकलेल्या डोंगररांगा

धुक्यांनी आच्छादलेला जलाशय

समोरचे दृष्य अनाकलनीय होते. दाट धुक्याच्या चादरीने सर्व डोंगर झाकलेले होते. घाटात उंचावर असताना देखील खाली काही दिसत नव्हते. समोर दूरपर्यंत धुके, मधूनच वर आलेले डोंगराची सुळके, आणि धोक्यांनी झाकलेले कोयना बॅक वॉटरचे पाणी. सह्याद्रीचे हे अविस्मरणीय रूप पहिल्यांदाच पाहत होतो.
सकाळी लवकरच बामनोली गावात पोहोचलो. इथूनच वाचवण्यासाठी बोट मिळणार होती.जलाशयाकडे गेलो तर दुस-याने आच्छादलेल्या पाण्यामध्ये अगदी दहा मीटर च्या पुढे काहीही दिसत नव्हते. पिक्चर मध्ये अनंतात विलीन होण्याचा सीन बहुधा अशा ठिकाणी घेत असतील. तेथील एका फ्लेक्सवर बाम मुलीचा उल्लेख पश्चिम महाराष्ट्रातील मिनी काश्मिर असा देखील केला होता. सकाळी नऊ वाजता नाश्ता करून बोट मध्ये बसलो, समोर होते अथांग पाणी.
We  All ...😍

कोयना बॅकवॉटर:
कोयना धरणातील जलसाठा त्यामुळे मागील जवळपास 70 किलोमीटर मध्ये पाणी भरले आहे. अनेक डोंगर पाण्याखाली गेले आहेत.
नजरेच्या पहिल्या टप्प्यात "दुर्ग वासोटा "


जवळपास दिड तासाच्या प्रवासानंतर वनविभागाच्या चेक पॉइंट वर पोहोचलो.
नजर जाईल तिथपर्यंत शांत पाणी, थंड वारा, आसपासचे डोंगर, डोंगरावरील छोटी छोटी घरे, सेल्फीचा गोंधळ, ग्रुप फोटो, आसपासचा निसर्ग, कोणी फोन मध्ये व्यस्त तर कोणी निसर्गाच्या या अद्भुत रूपाकडे बघण्यात तल्लीन झाला होता. जणू काही अगदी निसर्गाने काढलेले स्वतःचे एक सुंदर निसर्ग चित्र.
We All...😍

चेक इन केल्यानंतर ट्रेकला सुरुवात झाली. घनदाट जंगलातून वर किल्ल्याकडे निघालो. गर्द झाडी, पक्षांचे आवाज, वन्य प्राण्यांच्या पाऊलखुणांचा माग घेत आत दाट जंगलात वाटचाल केली. वाटेतच एक थंड पाण्याचा झरा होता. निखळ, स्वच्छ, थंडगार पाणी पिऊन मन तृप्त झाले.


घनदाट झाड़ी

On  the way ...

😍

जवळपास दीड-दोन किलोमीटर गेल्यानंतर दीड किलोमीटरची सरळ चढण होती. खरंच शरीरातील त्राण संपला होता. तरी हळू थांबत किल्ल्याच्या महाद्वारातून आत गेलो.
महाद्वार

जुना चुण्याचा  घाना

पडझड झालेले मंदिर

घर

कोकण कडा:
हजारो फूट खोल, सरळ, मनात धाक निर्माण करणारी उंची, खरंच कोकणकडा शत्रूला थोपवण्यासाठी पुरेसा होता.
स्वछंदपने वावरणारे पक्षी


कोकणकडा

हिरव्यागार डोंगर रांगा, कोयनेचे पाणी, बुडालेले डोंगर, स्वच्छंदपणे आकाशात वावरणारे पक्षी, समोरचे नागनाथ मंदिर, कधीकाळी भव्यदिव्य असलेला पण पडझड झालेला वाडा सर्व काही मोहकच. सह्याद्रीचे रुद्र, विशाल, मोहक, खरंच नजरेचे पारणे फेडणारे ते रूप.

एक दृश्य

एका दमात जवळपास दीड तासात खाली उतरलो.
येताना परत निवांत पहुडलेले सर्वजण, शांत पाण्यावरील त्या लाटा, पाण्यातील लाटांमुळे तयार होणाऱ्या तरंगांची हालचाल आणि त्याच्या सोबतीला चमकता सूर्य.
मावळता सूर्य

नजरेच्या टप्प्यात लाऊंच वासोटा बघून खरच विश्वास बसत नव्हता घेतला इतक्या उंचावरच्या ट्रेक पूर्ण झाला.
याच प्रवासादरम्यान काही ३६०° फोटो घेण्याचा एक प्रयत्न केला आहे. ते पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
https://www.google.com/maps/contrib/116888411790658217604/photos
आवडलं...? नक्की कमेंट करा शेअर करा आणि नवीन अपडेट साठी ब्लॉगला सबस्क्राईब करा.
~संकेत तांबारे
ईमेल: sanket.tambare@pm.me

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Those 2 incredible days in Tarkarli...!!!

प्रवास वर्णन... Travelogue वगैरे वगैरे... खरंतर हे प्रवासवर्णन आग्रहाने मराठी लिहावे असे ठरवले. सुट्टीहून इथे आल्यावर फिरायला जायचे आहे हे तर नक्की होतो. पण कधी हे मात्र नक्की नव्हतं. अचानक कॉल आला. संदेश होता "पाच मिनिटात Cse stairs वर ये ट्रिपचे नियोजन करायचे आहे". उत्तेजित झालेला मी लगबगीने stairs वर पोहोचलो. स्वागत तर उत्साहाने झालेच. नंतर कळाले की परवा 29 तारखेला निघायचे आहे. मग काय गाडीचे नियोजन, हॉटेलचे नियोजन सर्वकाही डोळ्यासमोर येऊ लागले. यक्षप्रश्न होता कोण आणि किती जण येणार? अथक प्रयत्नानंतर सहा जण तयार झाले. मग काय, फोन करणे सुरु होतेच. काहीजण घरी विचारत होते तर काहीजण गावी होते. संध्याकाळपर्यंत सर्वांना विचारून झाल्यावर लक्षात आले की सर्वजण directly किंवा indirectly नाहीच म्हणत आहेत. गेल्या वेळेसारखेच परिस्थिती होती. गाडी बुक केली होती १७ सीटर, यायला तयार होते नऊ जण. मग काय आदल्या रात्री ती कॅन्सल करून तवेरा बुक करावी लागली. प्रारब्ध म्हणा किंवा नशीब म्हणा, काहीही म्हणा... या सहलीत आम्हाला काका भेटले. एक अवलिया व्यक्तिमत्व. बारावीनंतर मुंबईला घेऊन पैसे कमव...

Book Review: मी अल्बर्ट एलिस PART:1

Book Name: मी अल्बर्ट एलिस Writer: albert ellis Translated in Marathi by Dr. Anjali Joshi The book connects the youth as it tackles with the daily questions that youth generally faces. The great book, as per me. Some thoughts include: 1. Your parents are not responsible for development in the childhood. It's upon the baby how he develops himself. 2. There are some situations in life which make you angry. If we basically thought about this, this anger is caused by actions caused your thoughts ultimately resulting into your suffering So what if we could, control our thoughts in such situation, thus controlling our actions and reducing the consequences thereafter. 3. In the situations where you cannot control the situation due to pressure by external entities, think what thing you can do for the betterment of situation or for better utilisation of time. 4. Fears: Created by our thoughts, our thinking and ultimately frightening us only. So what we can do, change the way you t...