Skip to main content

जयपुर: The Pink City As They Say...

गोष्टी रेल्वे सफरीच्या

भाग 2

जयपुर: The Pink City As They Say...

रेल्वेचा सकाळचा प्रवास, रेल्वे स्टेशन वरचे ते पोहे, जलेबी आणि चहा, ते विहंगम दृश्य, शुष्क प्रदेश, रेताळ माती, दुरून येणारा रेल्वेचा आवाज, कदाचित सकाळ असल्यामुळे कमी गर्दी,रेल्वेच्या वेळापत्रकामुळे रात्रभर वेटिंग ताटकळत बसलेले काही प्रवासी, काहींच्या चेहऱ्यावर घरी जाण्याचा आनंद, उत्साहाने कामासाठी/शिक्षणासाठी वापस आलेले काही लोक, रेल्वे जनरल डब्यातून शहरात काहीतरी रोजगार मिळेन या आशेने आलेले लोक आणि बरेच काही...


राजस्थान...

नाव ऐकताच डोळ्यासमोर येणारे वाळवंट, राजे राजवाडे यांचा संपन्न इतिहास, वाळवंटातून जाणारे उंट, पारंपारिक राजस्थानी पोशाख, पगडी घातलेले लोक आणि बरेच काही. असे हे मनातले राजस्थानचे चित्र. उत्साहित मी रेल्वे स्टेशनच्या बाहेर पडलो.
सकाळचे सहा वाजले सकाळचे सहा वाजले होते. अजूनही जवळच असलेले मेट्रो स्टेशन उघडले नव्हते. जवळच चहा पिऊन मी बस स्टॉपवर गेलो.
खरंतर निमित्त होते NDA च्या परीक्षेचे. चौकशी करत करत परीक्षा केंद्रावर पोहोचलो. नंतर पेपर दिला. फक्त फिरायचे होते पण पेपर कसाही जाऊदे काही फरक पडणार नव्हता. तरीही चांगला गेला. पुढे select देखील झालो आणि सेलेक्शन साठी AFSB, Mysore ला देखील जाऊन आलो, ते नंतर कधीतरी. पेपर संपल्यानंतर बाहेर आलो, जेवण केले आणि आता समोर होता एक दिवस. या एका दिवसात खुप काही भेटलं प्रत्येक ठिकाणा विषयी थोडेफार.

जयपुर सारख्या एका शहरात फिरायचे होते आणि तेही लोकल ट्रान्सपोर्ट मध्ये. तिथून लोकल बस मध्ये बसून अमेर किल्ल्यावर गेलो.

आमेर किल्ला:
विस्तृत पसरलेला किल्ला, सगळीकडे पसरलेले सुंदर गार्डन, स्वच्छ परिसर, आजूबाजूला दिसणारे फॉरेनर्स, दगडी पायऱ्यांचा रस्ता, किल्ल्याचे भव्य बांधकाम, दूरवर दिसणारा बालेकिल्ला आणि बरेच काही. सर्व कसे भारी, मनाला सुख देणारे.
सर्वप्रथम गार्डन मधून फिरत फिरत वर किल्ल्यावर गेलो. या किल्ल्यावर जोधा-अकबर सिरीयल शूटिंग झाले. याचा पुरावा म्हणून की काय तिथे एक मोठ्या आकाराची कढई होती. तेथील संस्कृती कलाकृतींचे आणि विविध वस्तूंचे प्रदर्शन विक्री केंद्र देखील होते. वर अात बालेकिल्ल्याला तिकीट होते. आज सर्व भिंतींवर काचा असलेला महाल होता. वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या आकाराचे सर्व आरसे भिंतींवर चहूबाजूंनी लटकावले होते. त्यातून आपले सौंदर्य निहारत तेथील सौंदर्याचा आणि तिथून दिसणारा जयपूर शहराचे दृश्य हा अनुभव अविस्मरणीय होता.

हवा महल:
सुंदर कलाकृती युक्त, वेगवेगळ्या रंगांच्या काचांनी सजवलेला खिडक्या आणि आतील सौंदर्य अवर्णनीय होते.


जयपुर मेट्रो:
जयपुर मेट्रो मधून प्रवास आल्हाददायक होता कदाचित पहिल्यांदाच प्रवास करत असल्यामुळे उगीचच इकडून तिकडे फिरत होतो. स्वच्छ, सुंदर, जलद मेट्रोचा हा अनुभव सुखद होता.


जंतर मंतर:
19 खगोलशास्त्रीय यंत्रांचा समावेश असलेली आणि खगोलशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी सवाई राजा जयसिंग यांनी बांधलेली ही वास्तू. ही वास्तू युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहे.सेकंदाच्या पाचवा भाग आपण मोजू शकणारे सण डायल हे येथील प्रमुख आकर्षण.खरच भारतीय खगोल शास्त्र किती प्रगत होते याचा अंदाज आपल्याला जंतर-मंतर बघून नक्कीच येईल आणि त्याचा उपयोग ग्रहतारे यांच्या अभ्यासासाठी त्या काळात होत असे.

जयपुर मार्केट:
जयपूरला पिंक सिटी म्हणतात याच्यामागे मुख्य कारण येथील मार्केट. गुलाबी रंगाच्या संगमरवराचा अधिक वापर केल्यामुळे त्याला पिंक सिटी असे देखील म्हणतात. तेथे सांस्कृतिक वातावरण, राजस्थानी वस्तू, साहित्य, अन्न, लोक या सर्वांचा अनुभव तिथे घेता येईल.

थोडक्यात जयपूरचा हा अनुभव खूप भारी होता. अगदी अवर्णनीय, अविस्मरणीय अशा अनेक घटना त्यादिवशी घडल्या. राजस्थानी लोकांचा स्वभाव, "अतिथी देवो भव!"ही त्यांच्या मनात असलेली भावना, तेथील लोक, या सर्व गोष्टींनी मन भारावून गेले.

तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला? ते खाली कमेंट मध्ये नक्की कळवा.
आवडल्यास शेअर देखील करा.
~संकेत तांबारे
sanket.tambare@pm.me

Comments

Popular posts from this blog

Those 2 incredible days in Tarkarli...!!!

प्रवास वर्णन... Travelogue वगैरे वगैरे... खरंतर हे प्रवासवर्णन आग्रहाने मराठी लिहावे असे ठरवले. सुट्टीहून इथे आल्यावर फिरायला जायचे आहे हे तर नक्की होतो. पण कधी हे मात्र नक्की नव्हतं. अचानक कॉल आला. संदेश होता "पाच मिनिटात Cse stairs वर ये ट्रिपचे नियोजन करायचे आहे". उत्तेजित झालेला मी लगबगीने stairs वर पोहोचलो. स्वागत तर उत्साहाने झालेच. नंतर कळाले की परवा 29 तारखेला निघायचे आहे. मग काय गाडीचे नियोजन, हॉटेलचे नियोजन सर्वकाही डोळ्यासमोर येऊ लागले. यक्षप्रश्न होता कोण आणि किती जण येणार? अथक प्रयत्नानंतर सहा जण तयार झाले. मग काय, फोन करणे सुरु होतेच. काहीजण घरी विचारत होते तर काहीजण गावी होते. संध्याकाळपर्यंत सर्वांना विचारून झाल्यावर लक्षात आले की सर्वजण directly किंवा indirectly नाहीच म्हणत आहेत. गेल्या वेळेसारखेच परिस्थिती होती. गाडी बुक केली होती १७ सीटर, यायला तयार होते नऊ जण. मग काय आदल्या रात्री ती कॅन्सल करून तवेरा बुक करावी लागली. प्रारब्ध म्हणा किंवा नशीब म्हणा, काहीही म्हणा... या सहलीत आम्हाला काका भेटले. एक अवलिया व्यक्तिमत्व. बारावीनंतर मुंबईला घेऊन पैसे कमव...

वासोटा: घनदाट जंगलांनी वेढलेला एक अभेद्य गड...

डोंगर, बोट, पक्षी अणि दुरवर पसरलेले डोंगर📸 "वासोटा ट्रेक"कदाचित इतकीच माहिती होती ट्रेकला निघण्यापूर्वी, प्रत्यक्षात तो थरार अनुभवण्याचा भावनेनेच विचारता क्षणीच जाण्यास तयार झालो आणि हे सर्व झाले एका दिवसात. पूर्वी अनेकदा कोकणात गेलो होतो पण यावेळी घनदाट जंगलातला प्रवासाची मनात उत्सुकता होतीच. शेवटी तो दिवस आला. सकाळी चार वाजता आम्ही निघालो. प्रवास सुरू झाला. पहाटेचे थंड वारे, गाडीत वाजणारी गाणी, गप्पा गोष्टी, जवळपास सकाळी सहा वाजता कास पठारावर पोहोचलो. दाट धुक्यांनी झाकलेल्या डोंगररांगा धुक्यांनी आच्छादलेला जलाशय समोरचे दृष्य अनाकलनीय होते. दाट धुक्याच्या चादरीने सर्व डोंगर झाकलेले होते. घाटात उंचावर असताना देखील खाली काही दिसत नव्हते. समोर दूरपर्यंत धुके, मधूनच वर आलेले डोंगराची सुळके, आणि धोक्यांनी झाकलेले कोयना बॅक वॉटरचे पाणी. सह्याद्रीचे हे अविस्मरणीय रूप पहिल्यांदाच पाहत होतो. सकाळी लवकरच बामनोली गावात पोहोचलो. इथूनच वाचवण्यासाठी बोट मिळणार होती.जलाशयाकडे गेलो तर दुस-याने आच्छादलेल्या पाण्यामध्ये अगदी दहा मीटर च्या पुढे काहीही दिसत नव्हते...

Book Review: मी अल्बर्ट एलिस PART:1

Book Name: मी अल्बर्ट एलिस Writer: albert ellis Translated in Marathi by Dr. Anjali Joshi The book connects the youth as it tackles with the daily questions that youth generally faces. The great book, as per me. Some thoughts include: 1. Your parents are not responsible for development in the childhood. It's upon the baby how he develops himself. 2. There are some situations in life which make you angry. If we basically thought about this, this anger is caused by actions caused your thoughts ultimately resulting into your suffering So what if we could, control our thoughts in such situation, thus controlling our actions and reducing the consequences thereafter. 3. In the situations where you cannot control the situation due to pressure by external entities, think what thing you can do for the betterment of situation or for better utilisation of time. 4. Fears: Created by our thoughts, our thinking and ultimately frightening us only. So what we can do, change the way you t...