Skip to main content

Those 2 incredible days in Tarkarli...!!!

प्रवास वर्णन...
Travelogue वगैरे वगैरे...
खरंतर हे प्रवासवर्णन आग्रहाने मराठी लिहावे असे ठरवले.
सुट्टीहून इथे आल्यावर फिरायला जायचे आहे हे तर नक्की होतो. पण कधी हे मात्र नक्की नव्हतं. अचानक कॉल आला. संदेश होता "पाच मिनिटात Cse stairs वर ये ट्रिपचे नियोजन करायचे आहे". उत्तेजित झालेला मी लगबगीने stairs वर पोहोचलो. स्वागत तर उत्साहाने झालेच. नंतर कळाले की परवा 29 तारखेला निघायचे आहे. मग काय गाडीचे नियोजन, हॉटेलचे नियोजन सर्वकाही डोळ्यासमोर येऊ लागले. यक्षप्रश्न होता कोण आणि किती जण येणार?

अथक प्रयत्नानंतर सहा जण तयार झाले. मग काय, फोन करणे सुरु होतेच. काहीजण घरी विचारत होते तर काहीजण गावी होते. संध्याकाळपर्यंत सर्वांना विचारून झाल्यावर लक्षात आले की सर्वजण directly किंवा indirectly नाहीच म्हणत आहेत. गेल्या वेळेसारखेच परिस्थिती होती. गाडी बुक केली होती १७ सीटर, यायला तयार होते नऊ जण. मग काय आदल्या रात्री ती कॅन्सल करून तवेरा बुक करावी लागली.
प्रारब्ध म्हणा किंवा नशीब म्हणा, काहीही म्हणा... या सहलीत आम्हाला काका भेटले. एक अवलिया व्यक्तिमत्व. बारावीनंतर मुंबईला घेऊन पैसे कमवले. गाडी घेतली आणि गाड्यांचा धंदा सुरू केला आणि आता वर्षाला सहा गाड्या बदलतात. हे तर आमचे उत्तम फोटो काढणारे आमचे काका... (सांगून candid...!!!)
Me in the Rock Garden, Tarkarli

#TarkarliIsOn...!!!


काकाला फोन झाल्यावर गाडी fix झाली. मनोरमा निवास मध्ये फोन करून रूम confirm केली. नंतर शेवटी रात्री ८ जण तयार होते. गाडी तयार होती. हॉटेल बुक केले होते. आणि थोडक्यात "A night to go...", "Sea calling", "कोंकण calling" अशीच काहीशी भावना होती...


सकाळचे सव्वा तीन वाजले होते.अक्षय आला आणि म्हणाला पंधरा मिनिटात तयार व्हा आणि चला गाडी 15 मिनिटात पोहोचेल.लगबगीने आवरून प्रवासाला चार वाजता सुरुवात केली. विश्वजीत कोल्हापूर मध्ये बसला. सहा वाजता घाटात एका उंच पॉईंट वर आम्ही पोहोचलो. "सह्याद्री डोंगररांगा"... समोरचे दृष्य अनाकलनीय होते. हवेत थोडासा गारवा होता,अगदी मनाला थंडावा देईल इतका. समोर दृश्य होते, "एखाद्या चित्रकाराने काही फटकारे मारावे आणि प्रत्यक्ष डोळ्यासमोर यावे अशीच ती भावना होते."हिरव्यागार डोंगररांगा, नजर जाईल तिथपर्यंत डोंगर आणि डोळ्यांना सुख देणारे दृश्य. खऱ्या अर्थाने कोकणात, निसर्गाच्या सानिध्यात आल्याची भावना.
सह्याद्री डोंगररांगा


सकाळी दहा वाजता हॉटेलवर पोहोचलो."पांढरी रेती, कौलारू घरे, दोरीचा झोपाळा आणि नजरेच्या टप्प्यात दिसणारा समुद्राच्या लाटा खऱ्या अर्थाने डोळ्याचे पारणे फेडले ते याच दृश्याने." दुरून येणारा लाटांचा आवाज क्षणाक्षणाला खुणावत होताच. मग काय होते, निघालो आम्ही समुद्रात डुबायला, लाटा अंगावर घ्यायला आणि स्वतःला विसरायला.
Manorama Home Stay



Beach in the sight...!!!

#Tarkarli_Beach
गेल्यागेल्या गुडघ्या एवढ्या पाण्यात गेलो. स्वतःला समुद्राच्या पाण्यात झोकून दिले. येणाऱ्या लाटा तर होत्याच. आपोआप लाटांमध्ये मागे पुढे जाण्याची मजाच वेगळी. आठवणींसाठी दोन-तीन फोटो काढले आणि बस. मग खरी मजा सुरू झाली. एकमेकांना लाटांवर टाकून देणे, मधेच कोणाला तरी मागुन ढकलणे, येणाऱ्या लाटांना जाऊन भिडणे. इथे जास्त मजा येत नव्हती म्हणून कमरे एवढ्या पाण्यात गेलो. इथे मात्र लाटा  मागे मागे ढकलत होत्या. इथे खाली बसून डुंबण्याची मजाच वेगळी. मधेच एखादी मोठी लाट येते आणि मग नाकातोंडात पाणी जाते. लाटावर पडल्यावर तर खूपच मजा आली. पण एक भीतीचा क्षणही होता. एक मोठी लाट आली आणि पाण्यात आडवा झालो, पायाला जमीन लागेना, डोके पूर्ण पाण्याखाली, पण दोन-तीन क्षणानंतर सर्वकाही ठीक झाले. आता मात्र मी स्वतःला थांबवू शकलो नाही.
Enjoying in the sea...!!!


पाण्यात अजून आत गेलो. एक उंच लाट आली आणि बाहेर फेकला गेला. परत नवीन ऊर्जेने आत गेलो. खरंतर पाण्यातून बाहेर येणे तुलनेने सोपे आहे (लाटांसोबत आला तर उत्तमच).
पण आत जाणे तसे अवघड आहे. लाटांचा सामना करत परत छाती पर्यंत गेलो. अजून इच्छा झाली मग अजून थोडा पुढे गेलो. मनात भावना आली इथेच राहावे काही काळ.
लाट कितीही मोठी असली तरी या point वर ती फक्त एक लहर होती.(कमरे एवढ्या height नंतर तिची लाट होते). काही क्षणांसाठी पाण्यामध्ये तरंगल्यावर परत पाय जमिनीला लागत होते. पंधरा-वीस मिनिटे इथे थांबल्यावर असे वाटायला लागले होते,
It just feels awesome having submerged fully in sea, waves pushing you forwards and backwards, up and down, making you float automatically;
striking continuously under the strong sun...
The perfect state to forget about everything...
#awsomeExperiences
#TarkarliMemories
सर्वकाही विसरण्यासाठी एक उत्तम क्षण...
धडकणाऱ्या लाटा त्यांचे काम करत होते आणि तेव्हा वाटले, "That's life I want to live... Free...!!!"
नंतर अंघोळ, जेवण वगैरे वगैरे...


#कोंकणी_जेवण
जेवण उत्तम आहे. पण काहीवेळा गणित बिघडते आणि काही काहीच आवडत नाही. (कदाचित सर्व काही अनोळखी असल्यामुळे)

नंतर आराम आणि विश्रांती...

#रॉक_गार्डन
दगडांना धडकणाऱ्या समुद्राच्या लाटा, अस्ताला जाणारा सूर्य, लाटांचा पांढरा फेस, अगदी तासन-तास बघत बसावे असे दृश्य.
The waves striking the rocks in the falling sun...
VivekSathis


नंतर जेवण, जेवणानंर it was time to have some fun!!!
समुद्रावरील वारे, party songs, अधूनमधून कानावर पडणाऱ्या लाटांचा आवाज, हिरव्या एलईडीचा फिकट प्रकाश, झाडाला बांधलेले दोन झोपाळे, आणि आम्ही नऊ जण.
Perfect combination for every night...
स्वतः मध्ये हरवून जाऊन निवांत बघण्याचा तो एक क्षण.

#Night_Beach (१२ am)
खरतर दिवसा समुद्र बहुतेक वेळा बघितला होता पण रात्री... (त्या रात्रीआधी तर नाही)
अंधारातून दुरून येणारा लाटांचा आवाज, हळूहळू वाढणारा तो आवाज, कदाचित अमावस्यामुळे आत गेलेले समुद्राचे पाणी, निळाशार समुद्रातील पांढऱ्या फेसाळ लाटा, निरभ्र आकाशातील हजारो तारे सर्व काही अनाकलनीय, अदभुत...!!!
पायाखाली एखादा खेकडा सापडण्याची भीती तर होतीच.
तिथे अर्धा तास बसल्यावर मनाची इच्छा नसताना देखील, केवळ थकलेल्या शरीरामुळे  झोपायला परतलो. झाला पहिला दिवस कसा संपला कळलेच नाही.
याच समुद्रावरील रात्रीसाठी सुचलेल्या काही ओळी,
"Away from everything, amidst the nature, with the life's dearest one's, hearing the sound of sea waves all the night, with the air waves soothing one's...
#NivantLife..."

#Day_2
दुसरा दिवस उजाडला. सर्व जण उठले. आणि आता वेळ होती tsunami island वर जाण्याची...

#Tsunami_Island
"कधीकाळी सुनामी आल्यावर वर आलेल्या या द्वीपावर गुडघ्या एवढ्या पाण्यात, समुद्रात ६ km आत नाश्‍ता करण्याची मजा काही औरच..."
परत बोटीमध्ये बसलो. समुद्रात आत  सहा किलोमीटरवर संगम होता; नदी व समुद्र यांच्या मिलनाची जागा, उंच लाटांनी भरलेला प्रदेश. तिथे गेल्यावर मुक्त सोडून दिलेल्या बोटीमध्ये बसण्याची गंमतच वेगळे. लाटांबरोबर हलणाऱ्या बोटीमध्ये मनात एक भीतीची भावना होतीच. जेव्हा दोन गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा संघर्ष अटळ असतो, पण इतका अद्वितीय संघर्ष प्रथमच पाहिला.
सकाळी सुनामी बेटावर जाताना बोटीमधून "हाऊस on waves" पाहिले, "House Boat" देखील भारी होती. अंगाला लागत असलेले थंड वारे शहारून सोडत होतं.

At Tsunami Island, Tarkarli...


#त्सुनामी_वरचा_नाष्टा
नाश्त्यामध्ये घावन (तांदूळ), उकडीचे मोदक आणि चहा. विशेष म्हणजे हे सर्व समुद्राच्या पाण्यात बसून.
#unforgettable_one

त्यानंतर वेळ होती water sports ची
#rafting
दोन व्यक्तींचा छोट्याशा नौकेमध्ये, अगदी पाण्यापासून इंचभर वर असणाऱ्या नौकेमध्ये, समुद्राच्या आत एकटे दीड-दोन किलोमीटर जाण्याची मजा काही औरच.
सुरुवातीला मजा आली, ताकद होती ना अंगात! हाताने (चप्पूने) बोटीला पुढे ढकलत एक किलोमीटर आत गेलो. किनाऱ्याकडे पाणी शांत होते. पण आत समुद्रात लाटा होत्या. जेव्हा बोट तिथे गेली. खरंच सांगतो जीव मुठीत होता ! लाटांसोबत खालीवर उन्हाळ्यात छोट्याशा बोटीला कधी काय होईल सांगता येत नव्हते. आम्ही समुद्रात एक किलोमीटर आत; मदतीची अपेक्षा तर सोडाच, किनाऱ्यावरून आम्ही कोणाला दिसत देखील नव्हतो. कधी बोट उलटी होईल आणि आम्हाला समुद्रात ढकलून देईल याची आम्हाला कल्पना देखील नव्हती. पाण्यात मुक्त असलेली ही बोट, तिची होणारी हालचाल, सगळेच अगदी भितीदायक होते. पण सोबत विश्वजीत होता. सगळे निवांत असे आम्ही दोघे बोटीमधे मजा करत होतो.
पण अशातही तरलो...
तीस मिनिटांनी परत किनार्‍यावर आलो. खूप मजा आली वाटलं. असे वाटले, जर मी या भीतीचा सामना केला, तर अता काहीही अवघड नाही.

बर एवढं सगळं, छातीपर्यंत आज समुद्रात जाण, दीड किलोमीटर आत लाटांमध्ये छोट्याशा बोटीमध्ये जाण, एवढं केलं; पण खरंच मी या भीतीवर मात्र नक्कीच जिंकलो,
एवढ नक्की.

#देवगड
At Devbagh Beach, Devbagh

नंतर जेवून देवगड कडे रवाना झालो. "देवगड हापूस" इतक्या ठिकाणी वाचले होते की देवगड हापूस खायचाच होता. पहिल्यांदा देवगड बीच वर गेलो मस्त सुंदर सावलीत समुद्राकडे बघत बसतो.
तारकर्ली प्रमाणे हा समुद्र किनारा नव्हता. अत्यंत उंच लाटा. अगदी दोन तीन मीटर आत अर्धा माणूस बुडेल इतकी खोली. पण स्वच्छ सुंदर किनाऱ्याने मन सुखावले.

अतिश देवगड मध्ये भेटला. त्यानंतर त्याच्या घरी गेलो. कोकणामध्ये गावच तिथे बघायला मिळाले. घर, घरासमोरील अंगण, समोरच्या आंब्याची झाडे, लाल विटांनी बांधलेली घरे सर्व कसे मोहक होते. पोट भरून आंब्याचा आस्वाद घेतल्यानंतर, क्रिकेटचा एक डाव झाल्यानंतर, परतीचा प्रवास सुरु झाला. येताना देखील गाडीतील गाणी डान्स आणि मस्ती चालुच होती.
शेवटी साडेनऊला कॉलेज वर पोहचलो.


आणि ते अद्वितीय, अनाकलनीय, अदभुत, उत्साहाचे, मस्तीचे, मजेचे दोन दिवस संपले...
आवडले...???
तुम्हाला याविषयी काय वाटते ते नक्की कळवा...
~संकेत तांबारे
Email: sanket.tambare@protomail.com



















Comments

  1. अतिशय सुंदर पद्धतीने लेख लिहला हां संकेत तुम्ही, आवडला बर का आपल्याला,' खूप खूप तुमचे आभारी आहे, असच प्रेम राहुद्या आमच्यावर्ती

    ReplyDelete
  2. Replies
    1. Thank you a lot. This words of appreciation mean a lot to me.

      Delete
  3. मला मी अनुभवलेल्या गोष्टी शब्दात लिहायच म्हटलं की खुप जड जातं पण तु खुप चांगल्या प्रकारे सगळी वर्णने शब्दात मांडली आहेस..
    वाचत असताना सगळं जसच्या तस डोळ्यासमोरुन जात होतं..मस्तचं😊

    ReplyDelete
  4. छान !!अगदी सफर करून आल्यासारखं वाटलं.

    ReplyDelete

Post a Comment