Skip to main content

गोष्टी रेल्वे सफरीच्या....

 

भाग १: जयपूर- मुंबई- पुणे- कुर्डूवाडी

आयुष्यातील तो एक दिवस...


खरंच काय चालू आहे काय माहित नाही?
या पावसाळ्यात काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
नेहमीसारखाच तो एक प्रवास होता.
तोच तो जयपूर- मुंबई- पुणे प्रवास...
अगदी अदभुत असा तो रेल्वेचा प्रवास, प्रत्येक वेळेस नवीन आठवणींनी भरलेल्या प्रवासाची मजाच वेगळी!
रेल्वेत बसण्यापूर्वी रिझर्वेशन चार्ट बघण्याची असलेली घाई, आपल्या सीटच्या बाजूला कोणी 'F' आणि १८-२५ या दरम्यान कोणी आहे का नाही आणि आपला प्रवास सुखकर असणार की नाही याची रंगवलेली रम्य स्वप्न, अशा अनेक गोष्टींनी युक्त असा प्रत्येक रेल्वे प्रवास कदाचित त्यात भेटलेल्या विशिष्ट व्यक्तींनी अगदी रमणीय झाला हे मात्र नक्की!

रिझर्व्हेशन चार्ट बघून झाल्यावर रेल्वेत बसण्याची ती घाई, निवांत कानात हेडफोन्स टाकून प्रवासाची घेतलेली मजा, कधीतरी पुस्तकांची घेतलेली मजा, सर्वकाही निवांत सोडून आयुष्य जगण्याचे ते क्षण...

असच एकदा निघालो होतो,
प्रवासाचा मार्ग होता, राजस्थान- गुजरात- महाराष्ट्र,
प्रवासात किती अडथळे येऊ शकतात, घरी येण्यासाठी असलेली दुर्दम्य इच्छाशक्ती आणि एखाद्याचे नशीब किती बलवत्तर असू शकते याचा आलेला त्यादिवशीचा प्रत्यय खरंच "न भूतो न भविष्यती" असच होता.

प्रवासास सुरुवात अगदी व्यवस्थित झाली. सकाळी १० वाजता ट्रेन मध्ये बसलो. त्या काळात राजस्थान मध्ये जातीय अशांतता होती. लोक रेल्वे रुळ उखडून टाकत होते. नशीब बलवत्तर म्हणा की फक्त आमची ट्रेन वेळेवर बाहेर पडली. आमच्या नंतरची प्रत्येक ट्रेन ४-५ तास उशिराने धावत होत्या.
खरं तर नशिबाने तिथून व्यवस्थित बाहेर पडलो.

नंतर गुजरात मध्ये देखील अशीच परिस्थिती होती. त्यातून देखील अगदी सुखरूप बाहेर पडलो.

एकदा महाराष्ट्रात आले की मन शांत झाले. परत मुंबई वरून कुर्डूवाडी साठी ट्रेन मध्ये बसलो. खरं तर मुंबई-कुर्डूवाडी हा मार्ग परीचयाचा होता पण वेळ रात्रीची होती.
रेल्वे भिगवण येथे २ तास रात्री १-३० am च्या दरम्यान थांबली. माझ्यासारखे काही अतिउत्साही तरुण खाली उतरले आणि थांबले. बाकी सर्वजण निवांत ट्रेन मध्ये झोपले होते. या भिगवणमध्ये रात्री रेल्वेवर दरोडे पडतात याविषयी आम्हाला माहित नव्हते पण मागच्या स्टेशन वर पोलिसांनी सर्व दारे व खिडक्या बंद केली होती. आमची ट्रेन पुढे निघून गेली. पण आमच्या मागच्या ट्रेन ला भिगवण ला त्याच दिवशी लुटले. आम्ही पुन्हा वाचलो.

आता कदाचित २-२.३० am वाजले होते. कुर्डूवाडी यायला अजून १-१.३० तास वेळ होता. आम्ही दोघे जन आळीपाळीने अर्धा तास जागावे असे ठरवले. पण ज्यावेळी कुर्डूवाडी स्टेशन आले त्यावेळेस आम्ही दोघेही झोपलेलो होतो. कदाचित दिवसभराच्या प्रवासाने क्षीण झालेले शरीर थकले होते. ट्रेन २ मिनिटे थांबली आणि ट्रेन निघण्याची शिट्टी झाली. अचानक त्याने मला उठवले. मी अगदी वरच्या बेडवर होतो झ तसाच खाली उडी मारली आणि मोठा आवाज झाला. मी माझे साहित्य घेतले आणि लगबगीने झाली उतरलो. जसा झाली उतरलो तसाच ट्रेनने वेग घेतला. अगदी १ मिनिटं जरी उशीर झाला असता ना तर आम्ही सोलापूरलाच पोहचलो असतो.

एकाच प्रवासात गुजरातमधील दंगल, राजस्थानमधील गोंधळ, मुंबईतील लोकल, भिगवण मधील दरोडा आणि सकाळी ३ वाजता शेवटच्या क्षणाला ट्रेन मधून बाहेर पडलेला आम्ही, आणि हे सर्व एकाच दिवसात! खरंच तो दिवस अविस्मरणीय, अदभुत आणि अद्वितीय होता यात काही शंकाच नाही.

तर असा हा एक प्रवास अनुभव...
आवडला...?
तुम्हाला हा अनुभव कसा वाटला ते खाली कमेंट मध्ये नक्की कळवा. तुमचा एखादा प्रवासातील किस्सा देखील शेअर करा.

तुम्हाला असे अनुभव वाचायला आवडतील?
तर नक्की कमेंट करा.

आणि नक्की शेअर करा.
~संकेत तांबारे,
इमेल: sanket.tambare@pm.me

Comments

Popular posts from this blog

Those 2 incredible days in Tarkarli...!!!

प्रवास वर्णन... Travelogue वगैरे वगैरे... खरंतर हे प्रवासवर्णन आग्रहाने मराठी लिहावे असे ठरवले. सुट्टीहून इथे आल्यावर फिरायला जायचे आहे हे तर नक्की होतो. पण कधी हे मात्र नक्की नव्हतं. अचानक कॉल आला. संदेश होता "पाच मिनिटात Cse stairs वर ये ट्रिपचे नियोजन करायचे आहे". उत्तेजित झालेला मी लगबगीने stairs वर पोहोचलो. स्वागत तर उत्साहाने झालेच. नंतर कळाले की परवा 29 तारखेला निघायचे आहे. मग काय गाडीचे नियोजन, हॉटेलचे नियोजन सर्वकाही डोळ्यासमोर येऊ लागले. यक्षप्रश्न होता कोण आणि किती जण येणार? अथक प्रयत्नानंतर सहा जण तयार झाले. मग काय, फोन करणे सुरु होतेच. काहीजण घरी विचारत होते तर काहीजण गावी होते. संध्याकाळपर्यंत सर्वांना विचारून झाल्यावर लक्षात आले की सर्वजण directly किंवा indirectly नाहीच म्हणत आहेत. गेल्या वेळेसारखेच परिस्थिती होती. गाडी बुक केली होती १७ सीटर, यायला तयार होते नऊ जण. मग काय आदल्या रात्री ती कॅन्सल करून तवेरा बुक करावी लागली. प्रारब्ध म्हणा किंवा नशीब म्हणा, काहीही म्हणा... या सहलीत आम्हाला काका भेटले. एक अवलिया व्यक्तिमत्व. बारावीनंतर मुंबईला घेऊन पैसे कमव...

Book Review: मी अल्बर्ट एलिस PART:1

Book Name: मी अल्बर्ट एलिस Writer: albert ellis Translated in Marathi by Dr. Anjali Joshi The book connects the youth as it tackles with the daily questions that youth generally faces. The great book, as per me. Some thoughts include: 1. Your parents are not responsible for development in the childhood. It's upon the baby how he develops himself. 2. There are some situations in life which make you angry. If we basically thought about this, this anger is caused by actions caused your thoughts ultimately resulting into your suffering So what if we could, control our thoughts in such situation, thus controlling our actions and reducing the consequences thereafter. 3. In the situations where you cannot control the situation due to pressure by external entities, think what thing you can do for the betterment of situation or for better utilisation of time. 4. Fears: Created by our thoughts, our thinking and ultimately frightening us only. So what we can do, change the way you t...

वासोटा: घनदाट जंगलांनी वेढलेला एक अभेद्य गड...

डोंगर, बोट, पक्षी अणि दुरवर पसरलेले डोंगर📸 "वासोटा ट्रेक"कदाचित इतकीच माहिती होती ट्रेकला निघण्यापूर्वी, प्रत्यक्षात तो थरार अनुभवण्याचा भावनेनेच विचारता क्षणीच जाण्यास तयार झालो आणि हे सर्व झाले एका दिवसात. पूर्वी अनेकदा कोकणात गेलो होतो पण यावेळी घनदाट जंगलातला प्रवासाची मनात उत्सुकता होतीच. शेवटी तो दिवस आला. सकाळी चार वाजता आम्ही निघालो. प्रवास सुरू झाला. पहाटेचे थंड वारे, गाडीत वाजणारी गाणी, गप्पा गोष्टी, जवळपास सकाळी सहा वाजता कास पठारावर पोहोचलो. दाट धुक्यांनी झाकलेल्या डोंगररांगा धुक्यांनी आच्छादलेला जलाशय समोरचे दृष्य अनाकलनीय होते. दाट धुक्याच्या चादरीने सर्व डोंगर झाकलेले होते. घाटात उंचावर असताना देखील खाली काही दिसत नव्हते. समोर दूरपर्यंत धुके, मधूनच वर आलेले डोंगराची सुळके, आणि धोक्यांनी झाकलेले कोयना बॅक वॉटरचे पाणी. सह्याद्रीचे हे अविस्मरणीय रूप पहिल्यांदाच पाहत होतो. सकाळी लवकरच बामनोली गावात पोहोचलो. इथूनच वाचवण्यासाठी बोट मिळणार होती.जलाशयाकडे गेलो तर दुस-याने आच्छादलेल्या पाण्यामध्ये अगदी दहा मीटर च्या पुढे काहीही दिसत नव्हते...